Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस!, २३ जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासाठी यलो अलर्ट जारी. दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता, मुंबईतही जोरदार पाऊस आणि सोसाट्याचे वारे.
मुंबई : 31 ऑगस्ट महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये रविवारी अस्मानी संकट ओढवू शकते! हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 23 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाट भाग आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील 24 तासांची हवामान स्थिती
सर्वाधिक प्रभावित होणारा भाग दक्षिण कोकण असणार आहे, जिथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाट भाग आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळासोबत पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातही मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबईसाठी विशेष इशारा
मुंबईत आज ढगाळ आकाश आणि मध्यम पाऊस होईल, आणि संध्याकाळी व रात्री सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दिवसात मुंबईतील कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 26°C असण्याचा अंदाज आहे.
यलो अलर्ट जाहीर केलेले जिल्हे
हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये यलो अलर्ट जाहीर केला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांतील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
नाशिक आणि विदर्भ, विजांसोबत पाऊस
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये विजांसोबत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, नागपूर आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यातही काळजी
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांसोबत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
सावधगिरी बाळगा
सणासुदीच्या काळात या हवामान स्थितीमुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. राज्यातील नागरिकांना हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
*****************
Weather News Maharashtra : पावसाचा मुक्काम वाढणार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; हवामान विभागाचा अंदाज, समुद्रात वादळी स्थिती
Maharashtra Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून जोरदार पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय समुद्रात वादळी स्थिती निर्माण होणार असून, प्रतितास ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे.
ऐन गणेशोत्सवात सुरू असलेल्या पावसामुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात पावसाचा जोर कायम राहिला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी (ता. २८) सकाळी पावसाने दहापर्यंत झोडपून काढले; परंतु, त्यानंतर सायंकाळी काही भागात उघडीप दिली. काही भागात हलक्या सरी सुरू होत्या. रात्री काही भागात रिपरिप सुरू होती; परंतु, आज सकाळपासूनच पावसाचा जोर पुन्हा वाढला. जिल्ह्यात सरीवर सरी कोसळत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने देखील सिंधुदुर्गला आज आँरेज अलर्ट दिला होता. वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, कुडाळमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. या तालुक्यांमध्ये सरीवर सरी कोसळत आहेत. मालवण, वेंगुर्ला, देवगड, दोडामार्ग तालुक्यात रिपरिप कायम होती. पावसामुळे जिल्ह्यातील गड, शुक, तिलारी, तेरेखोल, भंगसाळ नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.
पावसाचा जोर वाढल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन घरोघरी करण्यात आले आहे. भजन, आरत्या घरोघरी होत आहेत; परंतु, या सर्वांमध्ये पावसाचे विघ्न कायम आहे. पावसामुळे गणेशभक्त अक्षरक्षः हैराण झाले आहेत.
यलो अलर्ट दोन सप्टेंबरपर्यंत
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दोन सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मच्छीमारांना इशारा
जिल्ह्यात एकीकडे जोरदार पाऊस पडत असताना समुद्रात देखील वादळी स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. समुद्रात प्रतितास ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
**************
Weather Alert: ऑगस्टच्या शेवटी पावसाला उधाण, मुंबईत वाऱ्याची तीव्रता, कोकणाला यलो अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
Maharashtra Weather Forecast: ऑगस्ट महिन्याचा शेवट जवळ येत असतानाही पावसाची तीव्रता कमी झालेली नाही. संपूर्ण महिनाभर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाने दमदार उपस्थिती दाखवली.
आज, 30 ऑगस्ट रोजीदेखील काही भागांत पुन्हा एकदा मुसळधार सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चला तर पाहूया मुंबई आणि कोकणातील आजचा हवामान अंदाज.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळपासून रिमझिम सरी सुरू आहेत. दुपारनंतर काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मुसळधार सरींची नोंद होऊ शकते. हवामान खात्याने या ठिकाणी कोणताही विशेष अलर्ट जारी केलेला नाही. या भागातील तापमान आज 24 ते 30 अंश सेल्सियसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. वारे दक्षिण-पश्चिम दिशेने मध्यम वेगाने वाहतील. वातावरण ढगाळ असून दमट हवामान कायम राहील.
मुंबईत आज रिमझिम पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. सकाळपासून हलक्या सरी पडत असून दुपारनंतर किंवा संध्याकाळकडे काही भागांत जोरदार पावसाच्या सरींचा अनुभव येऊ शकतो. मात्र हवामान खात्याने मुंबईसाठी कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. आजचे किमान तापमान 25 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सियस इतके राहील. पश्चिम-दक्षिणेकडून मध्यम गतीने वारे वहातील. एकूणच स्थिती सुरळीत असून शहरात पाणी साचण्यासारखी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाही.
पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होणार आहे. विशेषत: समुद्रकिनारी भागांत संध्याकाळकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचे तापमान 25 ते 29 अंश सेल्सियसदरम्यान राहील. किनारी भागात 20 ते 25 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईत कबुतरांसाठी आंदोलने मान्य, मग मराठी माणसाला बंदी का? संजय राऊतांचा फडणवीसांना प्रश्न
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून दुपारी तसेच रात्रीच्या सुमारास मुसळधार सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागात आजचे तापमान 24 ते 29 अंश सेल्सियसदरम्यान राहील. समुद्र उग्र राहण्याचा अंदाज असून 25 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे सुटतील. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read more news like this on marathi.timesnownews.com
***************
जळगाव जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढणार ; आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज वाचा..
ज ळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । जळगावसह राज्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून यामुळे जळगाव जिल्ह्यात अजून काही दिवस पावसाचा मुक्काम वाढणार आहे.
ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अशातच हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज वर्तविला आहे. आगामी तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त झाला असतांना, हवामान विभागाकडून आगामी दोन दिवस पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या दर्शनाला तीन दिवस पावसाचे विघ्न कायम राहणार असून तर शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढणार आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांनी धोक्यात आली होती. मात्र १५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार आगमन केलं. जिल्ह्यातील काही तालुक्यांना मुसळधार पावसाने झोपडून काढलं होते. या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली, तर दुसरीकडे काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. आता मागच्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु असून त्यात अधूनमधून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. या सततच्या पावसाने खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे
सततच्या पावसाने शेतात पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे किडीचा देखील मोठा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. परिणामी, पिकांची वाढ खुंटली असून,उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. आता पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आगामी पाच दिवसांचा अंदाज…
दिनांक आणि वातावरणाची स्थिती…
२९ ऑगस्ट : ऑगस्ट वादळी पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
३० ऑगस्ट : विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
३१ ऑगस्ट : वादळी पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)
१ सप्टेंबर : मध्यम पावसाचा अंदाज
२ सप्टेंबर : मध्यम ते तुरळक पावसाचा अंदाज
*************
Monsoon Rain: विदर्भात २ दिवस पावसाचा अंदाज; कोकण, घाटमाथ्यावर ५ दिवस पावसाची शक्यता
Pune News: मागील आठवडाभरात राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या सरी राज्यभरात पडत आहेत. पुढील ५ दिवस राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला
आज कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान
मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य
उद्याही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
https://youtube.com/watch?v=fbwhLop1uag%3F1%3D0%26playsinline%3D1%26modestbranding%3D1%26autoplay%3D0%26loop%3D1%26enablejsapi%3D1%26origin%3Dhttps%253A%252F%252Fm.test.in%26widgetid%3D1%26forigin%3Dhttps%253A%252F%252Fm.test.in%252F%26aoriginsup%3D1%26vf%3D6
सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
********::+***
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Weather Alert | ऑगस्ट महिन्याचा शेवट होत असतानाही राज्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी झालेली नाही. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज, ३० ऑगस्ट रोजीदेखील अनेक भागांत पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत हलक्या ते मध्यम सरी तर कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज शहराचे किमान तापमान २५ अंश तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस राहणार आहे. (Maharashtra Weather Alert)
दक्षिण-पश्चिमेकडून मध्यम वेगाने वारे वाहतील. शहरात पाणी साचण्याची विशेष शक्यता नाही, मात्र दमट हवामान कायम राहील. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात देखील अशीच स्थिती असून दुपारनंतर मुसळधार सरींचा अनुभव येऊ शकतो.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून रिमझिम सरी सुरू असून दुपारी व रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तापमान २४ ते २९ अंश सेल्सियसदरम्यान राहील. समुद्र उग्र राहण्याची शक्यता असून २५ ते ३० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)
पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम सरींची नोंद होईल. समुद्रकिनारी भागांत संध्याकाळकडे पावसाचा जोर वाढू शकतो. येथील तापमान २५ ते २९ अंश सेल्सियसदरम्यान राहील. २० ते २५ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किनारी भागातील मासेमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.